उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमांसाठी मंगळवारी कार्यशाळा

 उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम

उपक्रमांसाठी मंगळवारी कार्यशाळा

 

अकोला, दि. 13 : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक, निर्यातदार, प्रक्रिया उत्पादक, नवउद्योजक यांच्यासाठी विनामूल्य कार्यशाळा आयसीएआय भवन येथे मंगळवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 या वेळेत होणार आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, नवउद्योजक, निर्यातदार यांना प्रोत्साहन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणे, रोजगार, स्वयंरोजगाराच्या विकासाच्या शक्यतांनुसार कार्यवाहीला दिशा देणे, उद्योजकीय वातावरण निर्माण करणे हा या कार्यशाळेचा हेतू आहे. केंद्र व राज्य शासनाचे विविध अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यावसायिक, निर्यातदार, शेतकरी संस्था, औद्योगिक संस्था, संघटना यांनी कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ