शहरात रहदारी नियंत्रणासाठी फिरते पथक जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय

 

शहरात रहदारी नियंत्रणासाठी फिरते पथक

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय

अकोला, दि. 26 : शहरातील रहदारी नियंत्रणासाठी फिरते पथक गठित करण्याचा निर्णय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आदेश निर्गमित केला.

शहरातील बाजारपेठा, गांधी चौक, खुले नाट्यगृह परिसर, कापड बाजार, शाळा, महाविद्यालयाचा परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने नो पार्किंग झोनमध्ये उभी केली जातात. वाहतुकीस अडथळा करणा-या वाहनांवर कारवाई करणे, नागरिकांना नियम व तरतुदी समजावून सांगणे, अशा ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असणा-या पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करणे यासाठी फिरते पथक गठित करण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यानुसार पथक गठनाचा आदेश जिल्हाधिका-यांनी जारी केला.

 

आदेशानुसार, वाहतूक नियंत्रण कक्षाचे ठाणेदार सुनील किनगे (मो. क्र. 9823111155), उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके (मो. क्र. 9075965254) व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक अधिकारी प्रवीण मिश्रा (मो. क्र. 9823521770) यांचा पथकात समावेश आहे.

पथकाने विविध ठिकाणी आकस्मिक भेटी देऊन रहदारीस अडथळा ठरणा-या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी. त्याठिकाणी उपस्थित वाहतूक पोलीस कर्मचा-यावर कारवाई करावी. वाहतूक नियम मोडणा-या नागरिकांना नियमांची माहिती द्यावी. आठवड्यातील कार्यवाहीचा अहवाल दर शुक्रवारी सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले