टपाल विभागातर्फे टपाल सप्ताहात विविध उपक्रम दुर्मिळ तिकिटांचे बुधवारी प्रदर्शन

 

टपाल विभागातर्फे टपाल सप्ताहात विविध उपक्रम

दुर्मिळ तिकिटांचे बुधवारी प्रदर्शन

अकोला, दि. 9 : टपाल विभागातर्फे जागतिक टपाल दिनानिमित्त आजपासून टपाल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत द अकोला फिलाटेलिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ तिकिटांचे प्रदर्शन अकोला येथील प्रधान डाकघर येथे दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजिण्यात आले आहे.  

 दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस जागनिक टपाल दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा होतो. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात डाक विभागाच्या भूमिकेबद्दल जागरुकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. टुगेदर फॉर ट्रस्ट हे यंदाचे टपाल सप्ताहाचे ब्रीदवाक्य आहे. जगातील सर्वात मोठे टपाल सेवेचे जाळे भारतात आहे. कोरोना महामारीच्या काळात टपाल विभागाने औषधे, जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वितरण केले.

          अकोला डाक विभागाद्वारे आजपासून 13 ऑक्टोबरपर्यंत टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी जागतिक टपाल दिवस, मंगळवारी (10 ऑक्टोबर) वित्तीय सशक्तीकरण दिवस, दि. 11 ऑक्टोबरला फिलाटली डे, दि. 12 ऑक्टोबरला मेल आणि पार्सल डे व दि. 13 ऑक्टोबरला अंत्योदय दिवस साजरा करण्यात येणार आहे. ,

सप्ताहादरम्यान डाक विभागाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रवर अधिक्षक डाकघर भोजराज वामनराव चव्हाण यांनी सांगितले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ