लोकशाही सभागृहात बैठक

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालय स्तरावर शिबिरे

 

अकोला, दि. २५ : वयाची १८ वर्षे पूर्ण करणारी एकही व्यक्ती मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालय स्तरावर शिबीरे घेण्याचा व 'स्वीप'अंतर्गत प्रभावी जनजागृती करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय स्वीप आढावा सभेत आज घेण्यात आला.

 

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून 'स्वीप'बाबत (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) बैठक लोकशाही सभागृहात झाली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, तहसीलदार पवन पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांच्यासह विविध विभागांचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

 

नवमतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग व आवश्यक त्या सर्व ठिकाणी शिबिरे घेण्यात येतील. सर्व विभागांनी स्वीप मोहिमेत सहभागी होऊन मतदार जागृतीसाठी रॅली, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, लघुपट, निबंध स्पर्धा आदी  विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन श्री. परंडेकर यांनी केले.

 

 

प्रत्येक तालुक्यात व गावोगाव नोंदणी शिबिरांचे नियोजन करावे. तसा आराखडा सादर करावा. सर्व विभागांनीही मतदार जागृतीसाठी अभिनव संकल्पना राबवून कार्यक्रम हाती घ्यावेत. त्याबाबतचा आराखडा लवकरात लवकर सादर करावा जेणेकरून पुढील कार्यक्रमाला दिशा मिळू शकेल. वसतिगृहांत राहणारे विद्यार्थी मतदानास पात्र ठरत असतील तर तिथे शिबिरे घ्यावीत. एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी नोंदणी मोहिम व्यापक स्वरूपात राबविण्याचे निर्देश श्री. परंडेकर यांनी दिले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम