मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमात आज अमृत कलश यात्रा

 

                                                                

मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमात आज अमृत कलश यात्रा

 

अकोला, दि. 11 ; मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमात जिल्ह्यातील सातही तालुके, एक महापालिका, पाच नगरपालिका व एका नगरपंचायतीतून अमृत कलश अकोला येथे उद्या सकाळी 8. 30 वा. हुतात्मा स्मारक येथे येणार आहेत. जिल्ह्यातील गावोगावची माती या कलशांमध्ये एकत्र करण्यात आली असून, हुतात्मा स्मारक येथून महापालिका शाळा क्र. 16 येथील अमृत वाटिकेपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

हुतात्मा स्मारक येथे अमृत कलश यात्रेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम होईल. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त व अनेक मान्यवर उपस्थित राहतील. अमृत वाटिका येथे जिल्ह्यातील सर्व कलशांचे संकलन होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातून 9 कलश हे दि. 25 ऑक्टोबर रोजी नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांमार्फत मुंबईमार्गे दिल्लीसाठी रवाना होतील. देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील. दि. 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या "अमृत वाटिके"त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल. 

००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ