सणांच्या काळासाठी पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये आदेश जारी

 सणांच्या काळासाठी पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये आदेश जारी

अकोला, दि. 4 : जिल्ह्यात नवरात्रौत्सव, तसेच दि. 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सव व बौद्ध धर्मियांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यावरील अधिका-यांना दि. 15 ऑक्टोबर ते दि. 27 ऑक्टोबर दरम्यान अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तसा आदेश पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी जारी केला.

रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, मिरवणूकांचे मार्ग विहित करणे, नदी, घाट याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिका-यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 36. 37 ते 40. 42, 43 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलीस अधिक्षकांनी आदेशात नमूद केले आहे.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ