नियमपालन न करणाऱ्या अन्न विक्रेत्यांकडून ४ लाख दंड वसूल 'एफडीए'ची कारवाई

 अकोला, दि. ७ :  गत सहा महिन्यांच्या काळात नियमपालन न करणाऱ्या विविध दुकाने, हॉटेल, उपाहारगृहांविरुद्ध केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने ४ लाख १७ हजार रू. दंड वसूल केला.

अन्न विक्रेत्यांकडील १७ अन्न नमुने अप्रमाणित आढळल्यावरून ३ लक्ष १४ हजार व नियमपालन न करणाऱ्या २० दुकानांकडून १ लक्ष ३ हजार ५०० रू. दंड वसूल करण्यात आला.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली अन्न सुरक्षा अधिनियम जिल्हास्तरीय समितीची गुरुवारी बैठक झाली. 
 त्यावेळी सहायक आयुक्त शरद तेरकर यांनी ही माहिती सादर केली.
 एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत करण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा श्री. तेरकर यांनी सादर केला. या कालावधीत अकोला जिल्ह्यात एकूण 99 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी 17 नमूने अप्रमाणित आढळून आले असून 3 लक्ष 14 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच 162 अन्न आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या त्यात नियम न पाळणाऱ्या 20 आस्थापनांकडून एकूण 1 लक्ष 3 हजार 500 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
अकोला शहरातील व जिल्ह्यातील हॉटेल, उपाहारगृहांच्या जास्तीत जास्त तपासण्या करून उल्लंघन करणाऱ्या पेढ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तसेच दुधातील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने अकोला शहरातील व जिल्ह्यातील किरकोळ दुध विक्रेते, दुध संकलन केंद्र यांच्या तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेले गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखू या पदार्थांची साठवणूक, वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्या. सर्व अन्न व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाप्रमाणे परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेऊन ते दुकानात दर्शनी भागात लावलेच पाहिजे यासाठी विभागाने कामकाज करावे, असेही त्यांनी सुचविले.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ