विविध मान्यवरांच्या सहभागासह सायकल रॅलीद्वारे मतदार जनजागृती



विविध मान्यवरांच्या सहभागासह

सायकल रॅलीद्वारे मतदार जनजागृती

 

अकोला, दि. 27 :  जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदार जनजागृतीसाठी शहरात आज सायकल रॅली काढण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

 

जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून  रॅलीचा शुभारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, महापालिका उपायुक्त गीता वंजारी आदी यावेळी उपस्थित होते.

  

रॅलीत ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘मी मतदार नोंदणी केली आहे. आपण केली का’ अशा फलकांसह व घोषणा नोंदविलेले टी शर्ट परिधान करून मान्यवर सहभागी झाले होते. ही रॅली अशोकवाटिका, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाईन चौक, दुर्गा चौक, अग्रसेन चौक, टॉवर चौक, बसस्थानक चौक, गांधी रोड मार्गाने पंचायत समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन समारोप झाला.

 

आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन नवमतदार, दिव्यांग, विमुक्त भटक्या जमाती, आदिवासी जमाती, महिला, तृतीयपंथी आदींसाठी मतदार नोंदणी शिबिरे व विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या सर्व मतदारांनी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

 

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले