पोस्ट्स

कोविडः आरटीपीसीआरमध्ये चार पॉझिटिव्ह तर रॅपिड ‘निरंक’

  अकोला , दि. 2 8 ( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 216 अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचे अहवाल   पॉ‍झिटीव्ह   आ ले,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 2 7 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   कुणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला   नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख् या 5789 9( 4328 8+ 14434 + 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर चार   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह चार . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 33 4246 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 33 0602 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 324 2    नमुने होते. आजपर्यंत एकूण 33 4246 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण न...

गायगाव ता.बाळापूर येथे सर्वाधिक लसीकरण

इमेज
  अकोला , दि. 27( जिमाका)-   कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत बाळापूर तालुक्यातील गायगाव येथे जिल्ह्यातील सर्वाधिक लसीकरण झाले आहे. सर्वाधिक लसीकरण केल्याबद्दल आशा, अंगनवाडी व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. जिल्ह्यातील इत्तर गावांत लसीकरणाची गती वाढवून 100 टक्के लसीकरण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. बाळापूर तालुक्यातील गायगाव येथे जिल्हाधिकारी यांनी भेट देवून लसीकरणाबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष शर्मा, गटविकास अधिकारी श्री. वाटेकर, गटशिक्षणाधिकारी गौतम बडवे, सरपंच   दिपमाला वानखडे, जिल्हा क्षेत्र लसीकणर निरीक्षक उमेश ताठे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात लसीकरण वेगाने सुरु असून गायगाव येथे जिल्ह्यातील सर्वाधिक लसीकरण झाले आहे.   गायगाव येथे एकूण 3855 लोकसंख्या असून लसीकरणाकरीता पात्र लसवंत 2776 असून त्यापैकी पहिला डोज घेतलेले 2749 लसवंत आहे. तर दुसरा डोज घेतलेले 1128 ...

कोविडः आरटीपीसीआरमध्ये दोन पॉझिटिव्ह तर रॅपिड ‘निरंक’

  अकोला , दि. 27( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 254 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचे अहवाल   पॉ‍झिटीव्ह   आ ले,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 26 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   कुणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला   नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख् या 57895 ( 43284 + 14434 + 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह दोन . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 334030 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 330388 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3240    नमुने होते. आजपर्यंत एकूण 334030 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहव...

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१ - निवडणूक यशस्वी पार पडावी याकरीता सज्ज रहा; निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांचे निर्देश

इमेज
अकोला , दि. 27( जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला , वाशिम , बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ   निवडणूक 2021 करीता मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यानी अधिक दक्ष राहून निवडणूक आयोगा ने जारी केलेल्या नियमांचे पालन करा. निवडणूक यशस्वी पार प डावी याकरीता सज्ज रहा, असे निर्देश निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक        डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दिले. अकोला , वाशिम , बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ   निवडणू कीच्या अनुषंगाने आज पहिली कार्यशाळेचे आयोजन नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी   संजय खडसे , बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, झोनल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाचे निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मार्गदर्शन करताना सूचना दिल्या की, विधान परिषद...

पीक कापणी प्रयोगाचा अहवाल अचूक व निर्धारित वेळेत द्या- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

  अकोला , दि. 26( जिमाका)- रब्बी पीक कापणी प्रयोगाच्या सर्व्हेक्षणकरीता जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गंत कापणी प्रयोगाच्या उत्पन्नाची अचूक आकडेवारी व निर्धारित वेळेत पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी मिळवून अहवाल सादर करा , असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. पिकांचा उत्पन्न अंदाज काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग व अंमलबजावणीबाबतच्या कार्यशाळेचे आयोजन नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , उपविभागीय कृषी अधिकारी के.बी. खोत , कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे , कृषी अधिकारी संध्या करवा , व्हि.एच.चव्हाण , कृषी पर्यवेक्षक एन.बी. राठोड , आर.आर. शेळके , पी.आर. घोंगळे   आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की , कापणी प्रयोगाच्या उत्पन्नाची अचूक आकडेवारी काढण्याकरीता नियोजन करा. पर्यवेक्षीय अधिकारी यांनी पिकांचे व गावांचे वाटप करुन अचूक सर्व्हेक्षण होईल याची दक्षता कृषी अधिकारी यांनी घ्यावी. पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षाची पिकांची सरासरी उत्पन्नाची आकडेवारी घ्या. पीक कापणी प्रयोगाच...

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१: निवडणूक निर्भिड व पारदर्शकपणे पार पाडा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

इमेज
  अकोला , दि. 26( जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला , वाशिम , बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ   निवडणूक 2021 करीता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन निवडणूक निर्भिड व पारदर्शकपणे पार पाडावी , असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले . जिल्हाधिकारी दालनात विधान परिषद निवडणूकीसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी   संजय खडसे , उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार , उमेदवारांचे प्रतिनिधी सागर खंडेलवाल , सुभाषसिंह ठाकूर , जयंत पोडोपाध्य आदी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निवडणूक कार्यक्रम , अद्यावत मतदार यादीची माहिती , तिन जिल्ह्यातील मतदान केंद्राची संख्या , मतदान करतानी घ्यावयाची काळजी व आचारसंहिता भंग होणार नाही याकरीता निवडणूक विभागाने जारी केलेल्या नियमाची माहिती उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीनेच मतदान व मतमोजणीकरिता   उमेदवार व प्रतिनिधींना मतदान व मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येईल. न...

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१ निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांनी केली मतदान, मतमोजणी केंद्र व स्ट्रॉंग रुमची पाहणी

इमेज
अकोला , दि. 26( जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला , वाशिम , बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ   निवडणूक 2021 करीता निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज मतदान, मतमोजणी केंद्र तसेच स्ट्रॉंग रुमची पाहणी केली.  आज सकाळी डॉ. पांढरपट्टे यांनी विधानपरिषद अकोला , वाशिम , बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ   निवडणूक 2021 करीता  अकोला तहसिलअंतर्गत असलेल्या अकोला शहरातील  मतदान केंद्र असलेल्या बी. आर. हायस्कूल येथील मतदान केंद्राची पाहणी केली. तसेच  अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सरकारी गोडावून मधील मतमोजणी केंद्र तसेच स्ट्रॉंग रुमची पाहणी केली. नकाशांची पाहणी करुन माहिती घेतली. दुपारनंतर ते अकोट तालुक्यातील व्यवस्थेच्या पाहणीसाठी रवाना झाले. ००००००

कोविडः आरटीपीसीआर व रॅपिड ‘निरंक’

  अकोला , दि. 26( जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 234 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही   अहवाल   पॉ‍झिटीव्ह   आला नाही,   असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काल (दि. 25 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये   कुणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला   नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख् या 57893 ( 43282 + 14434 + 177 ) झाली आहे ,   अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.   आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य   + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह शुन्य . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार ,   आजपर्यंत एकूण 333776 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 330135 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3239    नमुने होते. आजपर्यंत एकूण 333776   अहवाल प्राप्त झा...