सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद भाविकांनी व्यक्त केले समाधान नांदेड, दि. २५ जानेवारी:-श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी सेवा स्टॉल्स उभारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेडकरांना केले होते. या आवाहनाला नांदेडवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था, व्यावसायिक आस्थापना, व्यापारी संघटना, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, उत्पादक, उद्योजक तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत सेवा स्टॉल्ससाठी नोंदणी केली. समागम परिसराच्या चहूबाजूंनी निःशुल्क सेवा स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सवर चहा, बिस्किटे, नाश्ता, फलाहार, पाणी, सरबत, आईस्क्रीम, लस्सी, चिक्की, उसाचा रस आदी विविध पदार्थांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळाली. बीएसएनएलच्या वतीने मोफत सिमकार्डचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रमाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला. याशिवाय मेंदूची व्यायामशाळा, पर्यटन विकास, विमान उड्डाण क्षेत्रातील रोजगार संधी, कृषी व पोस्ट विभागाच्या ...