श्री गुरू तेग बहादूर यांचे 350 वे शहिदी समागम वर्ष शहरात उत्साहपूर्ण वातावरणात मोटरसायकल रॅली युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
श्री गुरू तेग बहादूर यांचे 350 वे शहिदी समागम वर्ष शहरात उत्साहपूर्ण वातावरणात मोटरसायकल रॅली युवकांचा उत्स्फूर्त सहभाग अकोला, दि. 3 : गौरवशाली इतिहास सादर करणारा चित्ररथ, बाईकवर उत्साहाने सहभागी तरूण, महिलाभगिनी, आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक तसेच आसमंत दुमदुमून टाकणारा संत, महापुरूष, शूरवीर, हुतात्मे यांचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त शहरात भव्य मोटरसायकल रॅली आज काढण्यात आली. श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त दि. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार असून, जिल्ह्यातील शेकडो भाविक नागपूरला जाणार आहेत. त्यानिमित्त अकोला शहरात गुरुद्वारा सिंघ सभा येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. प्रारंभी आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते रॅलीचा धार्मिक निशाण उंचावून शुभारंभ करण्यात आला. अनेक मान्यवर रॅलीत सहभागी होते. जिल्ह्यातून शीख, सिकल...