जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस

 

जिल्ह्यात पुढील पाच दिवस

विजेच्या कडकडाटासह पाऊस

अकोला, दि. 11 : भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात दि. 11 ते 16 जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असेल, असा अंदाज आहे.

नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये. वीज चमकत असताना मोबाईल, वीजेची उपकरणे बंद ठेवावी. वाहने वीजेचा खांब व झाडे यापासून दूर ठेवावीत, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन