मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम नवउद्योजक निर्मितीची पाऊलवाट - जिल्हाधिकारी अजित कुंभार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यशस्वी राबविणाऱ्या बँकर्सचा सन्मान







अकोला, दि. २० : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अकोला जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला हे निश्चितच  गौरवाची बाब असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत जिल्ह्यात नवउद्योजक निर्माण व्हावेत तेव्हाच 2047 च्या यशस्वी भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले ते जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार  समारंभात बोलत होते.यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा,  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, विभागीय सहसंचालक उद्योग गजेंद्र भारती,अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे,बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर भगवान सुरशे,स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर आशिषकुमार सिंग, सेंट्रल बँक व्यवस्थापक राजेश मिश्रा, एमसीडी प्रकल्प अधिकारी  प्रसन्ना रत्नपारखी आदी उपस्थीत होते..



यावेळी श्री.कुंभार यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम कामगिरी करणाऱ्या संबंधित यंत्रणा बँक अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.अकोला जिल्ह्यात शेती व्यवसाय मोठा असून व्यवसाय पूरक उद्योगासाठी कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने रोजगार निर्मिती कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावे असा आशावाद यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 2023-2024 साठी जिल्ह्याला 726 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट होते. तर अकोला जिल्हयात त्याहून अधिक 36 कोटी 59 लक्ष निधीतून 961 प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजननेत उत्कृष्ट कामगिरी करणारा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला.

2023-2024 मधील एकूण 961 प्रकरणांपैकी जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक 250 कर्ज  प्रकरणे मंजूर केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर स्टेट बँक ऑफ इंडियाने 124, बँक ऑफ महाराष्ट्रने 111, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 133, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने 68,  युनियन बँक ऑफ इंडियाने 65,  बँक ऑफ इंडियाने 42, कॅनरा बँकेने 39 व बँक ऑफ बडोदाने 41 प्रकरणे मंजूर केली त्याबद्दल प्रमाणपत्र देऊन जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज