पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये द्रव नत्रपात्र पोहोचविण्यासाठी इच्छुक वाहतूकदारांकडून अर्ज मागविले

                    

अकोला, दि. २१ : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये द्रव नत्र पात्र पोहोचविण्यासाठी इच्छुक वाहतूकदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  सन 2023-24 मध्ये 1 जुलै 2023 ते 30 जून 2024 जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन कार्यालयामार्फत अकोला जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये द्रवनत्र पात्राची वाहतूक करण्याकरिता निविदा मागविण्यात येत आहेत. निविदाबाबतच्या नियम, अटी, अर्जाचा नमुना या कार्यालयात रुपये 1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) भरून दि. 24 जून 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध होऊ शकेल.
निविदा दि. 26 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, अकोला यांच्या कार्यालयात स्विकारण्यात येतील. दि. 27 जून रोजी दुपारी 3 वाजता निविदा समिती समोर उघडण्यात येतील. निविदामध्ये वाहतूक दर प्रती कि.मी. असावा. निविदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार निविदा समितीने राखून ठेवले आहेत. निविदा समितीचे निर्णय अंतिम राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज