प्रमिलाताई ओक नाट्यगृहात आज युवाशक्ती करिअर शिबीर

 

कौशल्य व रोजगार विभागाचा उपक्रम

प्रमिलाताई ओक नाट्यगृहात आज युवाशक्ती करिअर शिबीर  

अकोला, दि. 18 : कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (मुलींची) सहकार्याने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर बुधवार दि.१९ जून रोजी सकाळी १० वाजता प्रमिलाताई ओक नाट्यगृह येथे होणार आहे.

इयत्ता १०  वी, १२ वी नंतर शिक्षणाच्या पुढील संधी, आयटीआय प्रशिक्षणाचे महत्त्व, तसेच आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगार, स्वयंरोजगाराच्या विविध संधी, पदवी पदविकेनंतर पुढील शिक्षण, रोजगार, उद्योजकता, परदेशातील शिक्षणाच्या संधी, व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून होईल. विविध मान्यवर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहतील.  

          जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य शरदचंद्र ठोकरे, जिल्हा संस्थेचे प्राचार्य सुनील घोंगडे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज