छायाचित्र मतदारयादी दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर मतदार नोंदणी कार्यक्रम आढावा बैठक संपन्न

 



अकोला, दि 27: 01 जुलै 2024  अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार नविन मतदार नोंदणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, मतदान केंद्राची सद्यस्थिती, मतदार यादीवरील आक्षेप, मतदाराचे स्पष्ट फोटो अपलोड करणे, ईपीक वाटप ई. बाबत दि. 25 जून 2024 पासून कार्यवाही सुरु करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने 31 - अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघामध्ये वास्तव्यास असणाऱ्या व मतदार यादीत अद्याप नाव नोंदणी नसलेले नागरीक 1 जूलै 2024 पूर्वी 18 वर्ष पूर्ण होणारे नवयुवक, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, विमुक्त भटक्या जाती व जमाती, आदिवासी जमाती, नवविवाहित महिला, ईत्यादी सर्व नागरीकांची मतदार नोंदणी करण्याकरीता जनजागृती करणे व अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.


त्याअनुषंगाने 31 अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी कार्यक्रमाबाबत माहिती देण्याकरीता सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांची आढावा सभा  25 जून रोजी पार पडली.यावेळी बिएलओ यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची सभा दि.26 जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली.नविन मतदार नोंदणी बाबत माहिती राजकीय पक्षांचे उपस्थित प्रतिनिधी यांना देण्यात आली.


नविन मतदार नोंदणी करीता नमुना ६, मयत व्यक्ती, दुबार नाव असलेले मतदार, व कायम स्थलांतरीत झालेली मतदार यांचे नाव वगळणी करण्याकरीता नमुना ७, नाव, जन्मतारीख, पत्ता ईतर दुरुस्ती करीता तसेच नविन मतदार ओळखपत्र मागणी करण्याकरीता नमुना ८, तसेच 31-अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार मतदार यादीत नाव टाकण्याकरीता आपण या कार्यालयाचे नेमण्यात आलेले बिएलओ तसेच उपविभागीय कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा. तसेच https://voters.eci.gov.in या लिंकवर जाऊन आपण ऑनलाईन सुध्दा मतदार नोंदणी अर्ज भरू शकता, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज