समाजकल्याण वसतिगृहांसाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

समाजकल्याण वसतिगृहांसाठी

ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

अकोला, दि. 19 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांत प्रवेशासाठी ऑफलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रत्येक वसतिगृहात प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत.

आठवी ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांना विनामूल्य भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, गणवेश, तसेच निर्वाह भत्ता दिला जातो. मूर्तिजापूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात शालेय विद्यार्थिनींसाठी 30 व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी 45 जागा उपलब्ध आहेत, इच्छूकांनी 7774991768 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल प्रमिला वाघ यांनी केले.

बार्शिटाकळी येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात, तसेच अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातही प्रवेश प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह भ्र. क्र. 83080 58833 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गृहपाल श्री. तिडके यांनी केले.   

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज