ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज मागविले
अकोला, दि २७ : १३ डिसेंबर २०२३ व दि. ११ मार्च २०२४ नुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना २०२४-२५ सत्रापासून कार्यान्वीत करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यायसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या,आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.अशा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली असून योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. सविस्तर अटी व शर्ती बाबतचा शासन निर्णय दि. ११ मार्च २०२४ शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा