जागतिक बाल कामगारविरोधी दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास कार्यालयातर्फे ‘ॲक्सेस टू जस्टीस’ प्रकल्प व ‘इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी’च्या सहकार्याने शहरात आज स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

 



बाल कामगारविरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी अभियान

अकोला, दि. 12 : जागतिक बाल कामगारविरोधी दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास कार्यालयातर्फे ‘ॲक्सेस टू जस्टीस’ प्रकल्प व ‘इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी’च्या सहकार्याने शहरात आज स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

 जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी फलकावर स्वाक्षरी करून अभियानाचा शुभारंभ केला.  अकोला जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी हॉटेल, उपाहारगृहे, वीट्टभट्टी कारखाने, गॅरेज, औद्योगिक वसाहती याठिकाणी जाऊन सर्वेक्षण व्हावे, तसेच पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याची सूचना अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी केली. शहरातील हॉटेल, गॅरेज, दुकाने, बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात जाऊन ‘आम्ही बालकांना कामावर ठेवणार नाही’ अशा संदेशफलकासह स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, बालकल्याण समिती अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, विनय दांदळे, प्रांजली जयस्वाल, शीला तोष्णीवाल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कौलखेडे, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर यांचे मार्गदर्शन लाभले,  उपक्रमासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, ‘ॲक्सेस टू जस्टीस’च्या सपना गजभिये, ‘चाईल्डलाईन’च्या हर्षाली गजभिये  यांचे सहकार्य मिळाले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज