जात पडताळणी कार्यालयाच्या वतीने विशेष त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त शाहू महाराज जयंती पर्व




अकोला दि, 27: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाच्यावतीने राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त 26 जून ते 02 जुलै  पर्यंत "राजर्षी शाहु महाराज जयंती पर्व" राबविण्यात येत आहे.26 जुन राजर्षी शाहु महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरा करण्यात येते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्यावतीने सामाजिक न्याय दिनानिमीत्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सामाईक परिक्षा 2024 चा निकाल जाहिर झाला आहे. सामाईक परिक्षेनंतर उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
सदर अर्जदार यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरीता अर्ज सादर केले नसेल त्यांच्याकरीता "अर्ज स्विकृतीसाठी विशेष खिडकीचे नियोजन" केले आहे.
दक्षता पथकातील प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याकरीता दक्षता पथकाचे कॅम्प  01 जुलै 2024 रोजी अकोला समिती कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तसेच विशेष त्रुटी पुर्तता शिबीर दि.03 जून ते 02 जुलै दरम्यान अकोला समिती कार्यालयात राबविण्यात येत आहे. अर्जदारांना त्रुटी ईमेल व एसएमएस तसेच पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.तरी सदर शिबीराचा सर्व अर्जदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष शरद कुलकर्णी,उपायुक्त तथा सदस्य अमोल यावलीकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज