मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करावी

- जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 24 -  जिल्ह्यात एक जुलै २०२४ या अर्हता दिनांकावरील मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, कोणताही पात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये,  असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
                        असा आहे कार्यक्रम

 निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा  विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यकम जाहीर करण्यात आला आहे. पुनरीक्षण पूर्व उपक्रमात मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांच्याव्‍दारा प्रत्‍यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी दि. 25 जून ते दि. 24 जुलैदरम्यान करण्यात येईल. त्यात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी, ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे व आयोगाच्‍या मानकानुसार छायाचित्र प्राप्‍त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, तसेच अस्‍पष्‍ट छायाचित्र बदलणे, केंद्राच्‍या यादीस मान्‍यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे आदी कामे केली जातील. 


एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी दि. 25 जुलै रोजी सर्व उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये आदी ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडेही ही यादी उपलब्ध असेल. त्यानंतर दि. 9 ऑगस्टपर्यंत दावे व हरकती स्विकारण्‍यात येतील.  या कालावधीत शनिवार व रविवारी विशेष मोहिमाही राबवल्या जातील. दि. 19 ऑगस्टपूर्वी दावे व हरकती निकालात काढल्या जातील.  मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी दि. 20 ऑगस्ट रोजी होईल. 

  मतदान केंद्र सुसूत्रीकरणः
ज्‍या मतदान केंद्रांवर 1500 पेक्षा अधिक मतदार असतील अशा तसेच ज्‍या मतदान केंद्रांच्‍या इमारती नादुरुस्‍त/शिकस्‍त अथवा ज्‍या मतदान केंद्रांवर मुलभूत सुविधा उपलब्‍ध नसतील अशा मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्‍यात येणार असून आवश्‍यकतेनुसार नवीन मतदान केंद्र तयार करण्‍यात येणार आहेत.

 प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर सदर यादीची तपासणी करुन सर्व मतदारांनी आपली नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत व त्यातील तपशील योग्य असल्याबाबत खात्री करावी. दि. 1 जुलै 2024 रोजी वा त्यापुर्वी वयाची 18 वर्षे पुर्ण होणा-या तसेच ज्या मतदारांची नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत अशा पात्र व्यक्तींनी आपले नांव नोंदविण्यासाठी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक पुराव्यांसह विहीत नमुना 6 सादर करावा अथवा मा.भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्यात आलेल्या voters.eci.gov.in या संकेत स्थळाचा / voter helpline या App चा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वापर करावा. विहित नमुने जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे उपलब्ध करुन दिले आहेत.
त्याचप्रमाणे, मयत किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नांवे वगळणी करणेकरीता विहीत नमुना 7 आवश्यक कागदपत्रांसह भरुन द्यावा, मतदारांच्या मतदार यादीमधील तपशीलामध्ये दुरुस्ती करणे, पत्ता बदलणे, नवीन मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळविणे इत्यादी साठी आवश्यक पुराव्यांसह विहीत नमुना 8 मध्ये अर्ज संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी/ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करता येईल.
ज्या मतदारांना त्यांच्या मतदार यादीमधील नोंदीशी त्यांचा आधार क्रमांक स्वयंस्फूर्तीने
 संलग्न करावायाचा आहे, त्यांनी विहित नमुना क्र. 6 किंवा 8 भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसिलदार कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज