समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरू

 

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरू

अकोला दि.11 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांत प्रवेशासाठी प्रवेश अर्जांचे वाटप सुरू आहे.

अकोला येथील गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता 11 वी,   पॉलिटेक्निक व  आयटीआय यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जागा उपलब्ध  असून त्यानुषंगाने अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. अकोल्याचा रहिवासी नसलेल्या परंतु अकोला महापालिकेच्या हद्दीतील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या किंवा घेऊ इच्छिणा-या जास्तीत जास्त होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यानी अर्ज करावे, असे आवाहन गृहपाल एस. एस. लव्हाळे यांनी केले आहे.  

अकोट येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात इयत्ता आठवी ते वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार प्रवेश अर्ज घेणे सुरू आहे. अनुसूचित जाती, जमाती, वि. जा. भ. ज., विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, दिव्यांग, आर्थिक मागास प्रवर्ग आदींना वसतिगृहातून प्रवेश अर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे.

                              

                               0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले