मुलींचे आयटीआय येथे बुधवारी मेळावा पं. उपाध्याय रोजगार महिला मेळाव्याद्वारे 85 पदे भरणार

 

मुलींचे आयटीआय येथे बुधवारी मेळावा

पं. उपाध्याय रोजगार महिला मेळाव्याद्वारे 85 पदे भरणार

अकोला, दि. 10 : जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्र व मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे दोन नामांकित कंपन्यांत पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याद्वारे महिला उमेदवारांतून 85 पदे भरण्यात येणार आहेत.

महिला उमेदवारांसाठी हा विशेष मेळावा दि. 12 जून रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत मुलींचे मनकर्णा प्लॉट येथील मुलींचे आयटीआय येथे होईल.  खामगाव येथील औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीत प्रशिक्षणार्थींची 15 पदे भरण्यात येतील. त्यासाठी 20 ते 30 वयोगटातील दहावी किंवा बारावी, तसेच फिटर, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिशियन आदी ट्रेडमधील आयटीआय, एक वर्ष अप्रेंटिसशिप किंवा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

बारामती येथील पियाजियो व्हेईकल या कंपनीत 70 पदांसाठी मागणी आहे.त्यासाठी 18 ते 30 वयोगटातील दहावी किंवा बारावी, फिटर, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, मशिनिस्ट, वेल्डर, पेंटर, इलेक्ट्रिशियन किंवा डिप्लोमा मेकॅनिक, ऑटोमोबाईल आदी असणे आवश्यक आहे. इच्छूकांनी महास्वयम् संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, तसेच दि. 12 जून रोजी मुलींचे आयटीआय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9665775778 किंवा 0724-2433849 येथे संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज