छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराला मोठा प्रतिसाद युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी महत्वाचा उपक्रम - खासदार अनुप धोत्रे

 

 






छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराला मोठा प्रतिसाद

युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी महत्वाचा उपक्रम

-         खासदार अनुप धोत्रे

अकोला, दि. 19 : देशातील तरूणाईतून उद्योजक, तसेच कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी अनेकविध योजना- उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन व दिशा देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर हे महत्वाचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे केले.

 

कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (मुलींची) सहकार्याने प्रमिलाताई ओक नाट्यगृह येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कौशल्य विकास विभागाचे अधिकारी ग. प्र. बिटोडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, प्राचार्य एस. बी. घोंगडे, प्राचार्य शरदचंद्र ठोकरे, उद्योजकता विकास केंद्राचे प्रसन्न रत्नपारखी, ‘अवेक’चे दीपक जागृत, प्रा. प्रवीण बोंद्रे, माजी प्राचार्य शरद झोडपे आदी उपस्थित होते.  

खासदार श्री. धोत्रे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेनुसार विविध योजना- उपक्रमांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री, अन्नप्रक्रिया उद्योग व विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय विकसित होत आहेत. विद्यार्थी व युवकांतून कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी  कौशल्य विकास विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतनासह प्रशिक्षण, तसेच विविध कर्ज हमी योजनांची अंमलबजावणी होत आहे, विद्यार्थ्यांनी याबाबत मार्गदर्शन मिळवून करिअरला दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.  

यावेळी श्री. पवार, श्री. घोंगडे, श्री. ठोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. बोंद्रे, श्री. झोडपे, श्री. रत्नपारखी, श्री. जागृत आदींनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी, आयटीआय प्रशिक्षणाचे महत्त्व, तसेच आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगार, स्वयंरोजगाराच्या विविध संधी, पदवी पदविकेनंतर पुढील शिक्षण, रोजगार, उद्योजकता, परदेशातील शिक्षणाच्या संधी, व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज