आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश सुरू

आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश सुरू

अकोला, दि. 25 : आदिवासी मुलींच्या व मुलांच्या अकोला येथील शासकीय वसतिगृहात रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

अकरावी, पदविका, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. त्यासाठी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरून त्याची प्रिंट व कागदपत्रांच्या प्रती जोडून वसतिगृहात आणून द्यावी. मुलींच्या वसतिगृहाचा पत्ता आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुने क्र. 1, तोष्णीवाल लेआऊट, तसेच आदिवासी मुलींचे वसतिगृह क्र. 2, दामले मार्केट, अकोला असा आहे. मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. 1 हे कृषीनगर येथे व क्र. 2 हे कीर्तीनगर येथे आहे.

अर्जासोबत महाविद्यालयात प्रवेश पावती, त्यापूर्वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अनुसूचित जात प्रमाणपत्र, 2024-25 चा उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची प्रत, शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे प्रमाणपत्र, दहावी गुणपत्रिका, आधारपत्र, बँक खाते, आधारपत्र, भ्रमणध्वनी क्रमांक लिंक असल्याचा पुरावा, पासपोर्ट आकारातील छायाचित्र व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे.

०००    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज