जिल्ह्यात शुक्रवारी साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग दिन

 

जिल्ह्यात शुक्रवारी साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग दिन

 

अकोला, दि. 19 : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सभागृहात शुक्रवार, दि. 21 जून रोजी सकाळी 7 ते 8 दरम्यान योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशिक्षण केंद्र, शाळा- महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नेहरू युवा केंद्र, योग भारती, पतंजली योग समिती, अजिंक्य फिटनेस पार्क, ज्येष्ठ नागरिक संघ, योग परिषद आदी विविध संस्थांचे सदस्य व क्रीडा संघटनांचे खेळाडू या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अधिकाधिक नागरिक, योगप्रेमी, खेळाडूंनी दीक्षांत सभागृहात सकाळी 6.30 वा. उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र अधिकारी यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज