शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर विविध कृषी साधने

 शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर विविध कृषी साधने

अकोला, दि. 25 : जि. प. उपकरातून सर्वसाधारण शेतक-यांसाठी  90 टक्के अनुदानावर कृषी साधने पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतक-यांनी दि. 10 जुलैपर्यंत पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी केले आहे.

योजनेनुसार सर्वसाधारण शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप, सोयाबीन स्वच्छ करण्यासाठी स्पायरल सेपरेटर ग्रेडर, प्लास्टिक ताडपत्री 450 जीसीएम, बॅटरी ऑपरेटेड पॉवरस्प्रेअर पंप, सोलर- विद्युत झटका मशिन तार कुंपण आदी साधने पुरविण्यात येतील. त्यासाठी पंचायत समितीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले