आयटीआय मुलींची अकोला प्रवेश अर्जाची अंतिम तारीख 30 जून.

 आयटीआय मुलींची अकोला प्रवेश अर्जाची अंतिम तारीख 30 जून.

अधिकाधिक विद्यार्थिनींंनी प्रवेश अर्ज दाखल करावे :- प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांचे आवाहन.
स्थानिक अकोट बस स्टॅन्ड , मनकर्णा प्लॉट स्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची )अकोला येथील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज दाखल करणे तसेच प्रवेश अर्ज निश्चित करणे दिनांक 30 जून पर्यंत नियमित सुरू असणार आहे . तर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी 15 जुलै पासून सुरू होण्याचे प्रस्तावित आहे.
आयटीआय मुलींची अकोला येथे समुपदेशन केंद्र सुद्धा कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.
प्रवेश प्रक्रिया तसेच विविध व्यवसाय , प्रवेश अर्ज इत्यादी संदर्भातील इत्यंभूत माहिती या केंद्राद्वारे प्रवेश इच्छुकांना मिळू शकते. तसेच ज्यांना आवश्यक असेल अशांना प्रवेश अर्ज भरण्याची सुद्धा सुविधा संस्थेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
100 टक्के जागा ह्या फक्त महिलांकरिता या संस्थेत राखीव आहेत
तेव्हा इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या अधिकाधिक महिलांनी तथा मुलींनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज दाखल करावा असे आवाहन आयटीआय मुलींची अकोलाचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी केले आहे.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाने गेल्या वर्षी पासून पात्र उमेदवारांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे. याचा लाभ प्रवेशित महिला आणि मुलींना मोठ्या प्रमाणावर होतो.
शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी दिलेल्या माहिती नुसार यावर्षी आयटीआय (मुलींची) अकोला येथे दोन वर्षीय अभ्यासक्रमांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक , इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या दोन व्यवसायाला प्रवेश होणार असून, एक वर्षीय अभ्यासक्रमामध्ये सेक्रेटरीयल प्रॅक्टिस ( इंग्रजी) , ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मेटोलॉजी, बेकर अँड कन्फेक्शनर, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट , इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन , फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसायांना प्रवेश देण्यात येणार आहे.
आयटीआयचा व्यवसाय केल्यावर शिकाऊ उमेदवार योजने मध्ये शिकाऊ उमेदवारी मिळते तद्वतच खाजगी तसेच शासकीय आस्थापनेवर नोकरीची सुद्धा संधी असून स्वयंरोजगार सुद्धा स्थापन करता येतो. तसेच पुढील शिक्षणाकरिता पदविका अभ्यासक्रम करायचा असल्यास दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळतो.
जिल्ह्याबाहेरील किंवा आडवळणाच्या गावावरून येणाऱ्या मुलींकरता संस्थेमध्ये महिला वसतिगृहाची सुद्धा व्यवस्था असल्याची माहिती प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी दिली. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुद्धा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अकोला येथे प्रशिक्षणार्थींना दिला जातो.
इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी ( आय.एम.सी.) अंतर्गत येणाऱ्या जागा करिता या वर्षी अत्यंत कमी प्रवेश शुल्क आकारले जाणार असल्याची आणि ही शुल्क रक्कम ' प्रवेश शुल्क प्रतिपूर्ती योजने ' अंतर्गत असलेल्या नियमांच्या अधीन राहून परत मिळणार असल्याची महत्वपूर्ण माहिती प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी दिली. तरी अधिकाधिक महिला आणि तथा मुलींनी दिलेल्या संकेत स्थळावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज दाखल करावा तसेच संस्थेला भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी केले असल्याची माहिती शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी एका माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज