जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

 जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता


अकोला, दि. २४ : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात आजपासून दि. २८ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असेल, अशी अटकळ आहे.

वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. वीज चमकताना मोबाईल व वीज उपकरणे बंद ठेवावी. वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे. वीज पडण्याची सूचना मिळविण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

        ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा