सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित वाद तडजोडीने मिटविण्याची संधी विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन

 

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित वाद तडजोडीने मिटविण्याची संधी

विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन

अकोला दि. 10 : नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दि. २९ जुलै ते ३ ऑगष्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे करण्यात आले आहे.

 विशेष लोकअदालत सप्ताहात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पध्दतीने सहभाग घे शकतात.

लोकअदालतीचे फायदे :

 साध्या व सोप्या पध्दतीने वाद मिटवता येतो.  झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणारा असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली अकोला जिल्ह्यातील प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा संबंधित तालूका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज