माना येथे आढळलेल्या जैन मुर्त्यांबाबत आवाहन



अकोला, दि. २६ : माना येथे खोदकामात आढळून आलेल्या जैन धर्मियांच्या पवित्र तीन मुर्त्यांबाबत जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी अधिसूचना जारी केली आहे.

भारतीय निखात अधिनियम 1878 च्या कलम पाच अन्वये ही अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार, दि.31 मार्च 2023 रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे माना येथील मातंगपुरा येथे रामेश्वर इंगोले  यांच्या घराच्या आवारात (नझूल भूखंड क्र. 181) पश्चिमेस खुल्या जागेत खोदकामात सांकेतिक चिन्हावरून जैन धर्मियांच्या नेमीनाथ भगवान, संभवनाथ भगवान, महावीर भगवान यांच्या तीन प्रतिमा आढळून आल्या. 

या 3 मूर्ती तलाठी यांच्यामार्फत पंचनामा करून माना येथील रामकृष्ण संस्थानचे अध्यक्ष हनुमंतराव बाजीराव देशमुख व सचिव शिवकुमार सुंदरलालजी व्यास यांच्या ताब्यात देऊन त्याबाबतचा सुपूर्दनामा तयार करण्यात आला. या मूर्ती कक्षाची चावी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आली आहे. 

सदर मुर्तीबाबत व त्यांचे काही भागाबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था यांना व्यक्तीशः अथवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत हक्क, दावा, हरकती व इतर बाबी लेखी स्वरुपामध्ये दाखल करावयाचे झाल्यास त्यांनी दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांचे दालन येथे उपस्थित राहून दाखल करावे. 

वरील नमूद तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या दावे, हरकती, हक्क याबाबतचा कोणताही विचार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे अधिसूचनेत नमूद आहे.


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज