हमीभाव योजनेत ज्वारी, मका खरेदीसाठी नोंदणीची मुदत दि. 30 जूनपर्यंत

 हमीभाव योजनेत ज्वारी, मका खरेदीसाठी नोंदणीची मुदत दि. 30 जूनपर्यंत

अकोला, दि. 24 : आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने ज्वारी, मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत दि. 30 जूनपर्यंत, तर खरेदीची मुदत दि. 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

 भरडधान्यात ज्वारी खरेदीचे 60 हजार क्विंटलचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांना नोंदणी करता यावी यासाठी आता दि.30 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणीसाठी शेतक-यांनी ज्वारी, मका पिकाची नोंद असलेला चालू वर्षाचा सातबारा, बँक पासबुक, आधारकार्डसह स्वत:  उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा विपणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे. ज्वारीचा हमीभाव प्रति क्विं. 3 हजार 180 रू. व मक्याचा 2 हजार 90 रू. आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा