खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून विविध विकासकामांचे नियोजन नियामक परिषदेची बैठक






खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून

विविध विकासकामांचे नियोजन

नियामक परिषदेची बैठक

अकोला, दि. 24 : जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे 8.30 कोटी निधीतून जिल्ह्यात विविध विकासकामांबाबत नियोजन परिषदेच्या बैठकीत आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार नितीन देशमुख, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले आदी उपस्थित होते.

गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्कापोटी जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे 21.33 कोटी रू. निधी आहे. त्यापैकी 8.30 कोटींतून विविध विकासकामांचे नियोजन बैठकीत करण्यात आले. त्यानुसार या निधीतून जिल्ह्यात आठ रूग्णवाहिका, सुमारे 8 जि. प. शाळांची दुरूस्ती, वर्गखोल्या, तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरूस्ती आदी विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले. विविध लोकप्रतिनिधींनी यावेळी कामांबाबत सूचना केल्या.

निधीतून जिल्ह्यात अधिकाधिक विकासकामे होणे आवश्यक आहे. सर्व लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव  व सूचना लक्षात घेऊन नियोजन लवकरात लवकर शासनाला मान्यतेसाठी सादर करावे.  या निधीतून विविध विकासकामांना चालना मिळणार आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले.

या कामांना लवकरात लवकर चालना मिळण्यासाठी गतीने कार्यवाही करावी, तसेच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आदी विविध क्षेत्रांतील लोकोपयोगी अधिकाधिक कामांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशीही सूचना त्यांनी केली.

०००   


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा