टपालाबाबत तक्रारींच्या निवारणासाठी 24 जून रोजी डाक अदालत

 

टपालाबाबत तक्रारींच्या निवारणासाठी 24 जून रोजी डाक अदालत

अकोला, दि. 11 : टपाल सेवेबाबत तक्रार सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ अनुत्तरित असल्यास डाक अदालतीत दाद मागता येते.  टपाल खात्याच्या अकोला येथील विभागीय कार्यालयात दि. 24 जून रोजी सकाळी 11 वा. डाक अदालत होणार आहे.

टपाल, स्पीड पोस्ट, वस्तू, पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डरबाबतची आपली तक्रार दि. 20 जूनपूर्वी प्रवर अधिक्षक डाकघर, सिव्हिल लाईन्स, अकोला या पत्त्यावर पाठवावी. सोबत अनुत्तरित तक्रारीबाबत अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत जोडावी.  एका अर्जासोबत एकच तक्रार असावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज