सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रभातफेरी

 





अकोला, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज जयंती अर्थात सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरीला समाज कल्याण सहायक आयुक्त एम.डब्ल्यू. मून यांनी हिरवी झेंडी दाखवली.


सामाजिक न्यायभवनापासून जेल चौक,अशोक वाटिका चौक,जिल्हाधिकारी कार्यालय,सरकारी बगीचा चौक मार्गे प्रभातफेरीचा समारोप पुन्हा सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला.

 यावेळी पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी,बार्टीचे समतादूत यांच्यासह कर्मचारी सहभागी होते.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज