बँक खात्यांशी आधार क्रमांक संलग्न करून घेण्याचे आवाहन

 


अकोला, दि 27: संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान हे महाडीबीटी प्रणालीव्दारे वितरीत करण्याच्या शासनाच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थी यांनी आपल्या बँक खात्याशी आपला आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा,असे आवाहन अकोट तहसिलदार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व पात्र लाभार्थी यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नसेल तर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता येणार नाही, असे आवाहन तहसिलदार डॉ. सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले