ओमायक्रॉनः सुधारीत निर्बंध जारी
अकोला दि . ३१ ( जिमाका)- ओ माय क्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन , मदत आणि पुनर्वसन यां च्या दि. ३० डिसेंबर रोजीच्या सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. यासुचना संपुर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता आज (दि.३१ डिसेंबर)पासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. ` सुधारीत नियमावलीः- १. लग्नसोहळा व लग्नसंमारंभाच्या बाबतीत , बंदिस्त जागा , हॉल , मेजवानी/मॅरेज हॉल इ. तसेच खुल्या जागेकरिता उपस्थितांची मर्यादा ५० पेक्षा जास्त ठेवता येणार नाही. २. इतर सामाजिक , राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत , जेथे उपस्थितांची उपस्थिती बंद जागेसाठी आणि खुल्या जागेसाठी ५० पेक्षा जास्त ठेवता येणार नाही. ३. अत्यंविधी करिता २० व्यक्ती मर्यादीत राहतील. ४. जि ल्ह्या च्या कोणत्या...