पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 8 हजार 91 प्रकरणे निकाली एकूण 16 कोटी 60 लक्ष रू. ची तडजोड

इमेज
  जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 8 हजार 91 प्रकरणे निकाली एकूण 16 कोटी 60 लक्ष रू. ची तडजोड अकोला, दि. 30 ; राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 1 हजार 299 प्रलंबित व 6 हजार 792 दाखलपूर्व अशा एकूण 8 हजार 91 प्रकरणात समेट घडून आला. त्यात एकूण 16 कोटी 60 लक्ष 74 हजार 975 रू. ची तडजोड झाली. जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबिक, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे शनिवारी (28 सप्टेंबर) राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. सर्व न्यायालयांतील 9 हजार 679 प्रकरणांपैकी 8 हजार 91 प्रकरणे निकाली निघाली. त्यात दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद याबरोबरच मोटार अपघात, एनआय ॲक्ट, ग्रा. पं. पाणीपट्टी, घरपट्टी, महावितरण व बँकांची प्रकरणे समाविष्ट होती. उपक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व न्यायाधीश, अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान मिळाले. अकोला जिल्हा बार असोसिएशन, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्य...

वसंतराव नाईक विजाभज महामंडळातर्फे आर्थिक दुर्बलांसाठी विविध योजना

  वसंतराव नाईक विजाभज महामंडळातर्फे आर्थिक दुर्बलांसाठी विविध योजना अकोला, दि. 27 विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एच. जी. आत्राम यांनी केले आहे. वसंतराव नाईक वि. जा. भ. ज. विकास महामंडळ, तसेच उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आणि पैलवान कै. मारूती चव्हाण - वडार आर्थिक विकास महामंडळांतर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना वैयक्तीक कर्ज बँक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना ऑनलाईन   पद्धतीने राबवल्या जात आहेत.   महामंडळाच्या vjnt.in या संकेतस्थळावर त्याचा तपशील पाहता येईल. त्याचप्रमाणे, बीज भांडवल कर्ज योजना व थेट कर्ज योजना या योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून त्याची अर्ज विक्री (अर्ज किंमत केवळ १० रू.) जिल्हा कार्यालयात सुरू आहे. हे कार्यालय   गौरक्षण रस्त्यावर पॉवर हाऊससमोर वैष्णवी कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावर आहे. संपर्क दूरध्वनी (०७२४) २४५९९३७ आहे. ...

कृषी विभागातर्फे रब्बीसाठी बियाणे वितरण अर्ज करण्याचे आवाहन

  कृषी विभागातर्फे रब्बीसाठी बियाणे वितरण अर्ज करण्याचे आवाहन   अकोला, दि. 30 : शासनाकडून अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळितधान्य पीके योजनेत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके, तसेच प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे.     चालू वर्षी हरभरा,   गहू, जवस , करडई, भूईमूग   व मोहरी या पिकांचे महा-डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार   आहेत. पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत. पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणा-या बियाण्याचा २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने   करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. ६ ऑक्टोबरपर्यंत बियाणे, औषधे व खते या टाईलअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी m...

‘पीएम किसान’ योजनेत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन

  ‘ पीएम किसान ’ योज नेत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन अकोला, दि. 26 : पीएम किसान योजनेत स्वयं नोंदणीकृत   लाभार्थीना   मान्यता मिळणे    व अपात्रता मागे घेण्याकरीता सर्व कागदपत्रांची पूर्तता अर्जदारांनी करावी , असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योज नेत नवीन   स्वयंनोंदणी   करणा -या लाभार्थ्यां नी योजनेच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे २०० केबी फाइल मर्यादेत अपलोड करावीत . त्यात मागील तीन महिन्यातील डिजिटल / तलाठी सहीचा ७/१२ उतारा , जमीन नोंदीचा फेरफार (लाभार्थीच्या नावे जमीन धारणा ०१/०२/२०१९ पूर्वीची असणे आवश्यक आहे. अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन   हस्तांतरण) . वारसा नोंद फेरफार मयत दिनांक ०१/०२/२०१९ नंतरची असल्यास ज्यांना नावावरून वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला /असलेला फेरफारही सोबत जोडावा. पती , पत्नी व १८ वर्षा खालील अपत्यांचे आधार कार्ड (सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत) . सर्व ऑनलाइन अ पल...

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने विविध कर्मचा-यांना प्रशिक्षण

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने विविध कर्मचा-यांना प्रशिक्षण अकोला, दि. 26 : येत्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू आहे. त्याअंतर्गत विविध बाबींच्या प्रशिक्षण सत्रांना सुरूवात झाली आहे. त्यात बुधवार व गुरूवारी दोन दिवसांचे प्रशिक्षण सत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.   आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ झाला आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी सत्राची आखणी केली असून, निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याशी संबंधित प्रत्येक बाबीचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचा-यांना देण्यात येत आहे.   दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या प्रथम दिवशी नामनिर्देशन, छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया, चिन्हवाटप या विषयावर उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान पथक, मतदान केंद्रे...

‘दिशा’ समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांविषयी चर्चा अपूर्णावस्थेतील कामे तत्काळ पूर्ण करा - खासदार अनुप धोत्रे

इमेज
  अकोला, दि. 25 : केंद्र शासनाच्या विविध योजनांतून जिल्ह्यात रस्ते, स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अशी कामे मंजूर करण्यात आली. तथापि, अनेक कामे अद्यापही अपूर्णावस्थेत असून, आचारसंहितेपूर्वी ती पूर्ण करण्याचे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे दिले.   जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार श्री. धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त सुनील लहाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मनोज जाधव आदी उपस्थित होते. खासदार श्री. धोत्रे म्हणाले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन अशा अनेक योजनांद्वारे विकासकामांचे नियोजन करून चालना देण्यात आली. तथापि, ही कामे विहित कालमर्यादित पूर्ण झालेली नसल्याचे दिसते. प्रशासनाने कामात गती आणून ती तत्काळ पूर्ण करावीत. जलजीवन मिशनमध्ये अ...

गत खरीपातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना आर्थिक सहाय्य

    गत खरीपातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना आर्थिक सहाय्य   अकोला, दि. २४ : कृषी विभागाने २०२३ च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पात्र शेतक-यांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून, संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे कृषी सहायकाकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. पात्र शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी १ हजार रू. आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर ५ हजार रू. अर्थसाह्य मिळणार आहे. गत हंगामात ई- पीक पाहणी, अॅप, पोर्टलद्वारे लागवडीची नोंद केलेल्या नोंदणीकृत शेतक-यांनाच हे अर्थसाह्य मिळेल. ही योजना केवळ   2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित आहे.   पात्र असलेल्या वैयक्तिक खातेदारांनी आधारपत्राची स्वसाक्षांकित छायांकित प्रत, संमतीपत्र व मोबाईल क्रमांक आदी माहिती जमा करावी, त्याचप्रमाणे, संयुक्त खातेदारांनी आधारपत्राची स्वसाक्षांकित छायांकित प्रत, संमतीपत्र, सामूहिक खातेदार ...

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देशप्रोत्साहनपर लाभ योजनेत तक्रार निवारण शिबिराचे आयोजन

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश प्रोत्साहनपर लाभ योजनेत तक्रार निवारण शिबिराचे आयोजन अकोला, दि. 24 : महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशान्वये सहकार विभागातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर लाभ योजनेत उद्यापासून (दि. 25)   शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.   कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ योजनेत लाभ न मिळालेल्या अर्जदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी रविवारी झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सहायक निबंधक कार्यालयात दि. 25, 26 व 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे. शासन निर्णयान्वये, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभासाठी 2017-18, 20218-19 आणि 20219-2020 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षात पीक कर्ज घेऊन नियमित परतफेड केलेल...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँक खाते आधार सीडिंग करून घ्यावे - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना  बँक खाते आधार सीडिंग करून घ्यावे - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. २३ : जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांनी अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सीडेड आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याला आधार सिडिंग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सिडींग करून घ्यावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.  डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. ऑनलाईन  अर्ज केलेल्या पात्र लाभार्थींना डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यात  लाभ जमा होणार आहे. तेव्हा लाभार्थ्यांनी  आधार सिडिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी केले. ०००

पालकमंत्र्यांच्या हस्ते घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व संत गाडगेबाबा नागरी बेघर निवारा इमारतीचे लोकार्पण

इमेज
  अकोला, दि. २२ : अकोला महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविकाअंतर्गत निर्मित संत गाडगेबाबा नागरी बेघर निवारा इमारतीचे लोकार्पण  राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज झाले. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने, जयंत म्हसने, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. अकोला महापालिकेच्या पुढाकाराने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. बेघर निवारागृहाच्या वास्तूची निर्मिती गुणवत्तापूर्ण झाली आहे. असे वेगवेगळे प्रकल्प महापालिकेने आदर्श प्रकल्प म्हणून चालवावे. शहराचे सौंदर्य व सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, असे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. ०००

पालकमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा पीक विमा तक्रारीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर बैठक घेणार शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

इमेज
  अकोला, दि. 22 : पीक विमा कंपनीने गत वर्षी खरीप हंगामात पंचनामे न करताच ‌प्रकरणे अपात्र ठरविल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत राज्यस्तरावरील यंत्रणेसमवेत पुढील दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात अतिवृष्टी , पीकविमा , पीक कर्ज आदींबाबत , तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण , युवा कौशल्य प्रशिक्षण , अन्नपूर्णा , वयोश्री , तीर्थदर्शन , बळीराजा सवलत व इतर योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे , आमदार रणधीर सावरकर , आमदार प्रकाश भारसाकळे , आमदार हरिश पिंपळे , आमदार वसंत खंडेलवाल , आमदार अमोल मिटकरी , जिल्हाधिकारी अजित कुंभार , जिल्हा परिषदेच्या सीईओ बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह , महापालिका आयुक्त सुनील लहाने , उपवनसंरक्षक कुमार स्वामी आदी उपस्थित हो ते. पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, पीक विम्याबाब...

शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

इमेज
  अकोला, दि. २२ : सततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील शिवापूर येथे शेसततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला तालुक्यातील शिवापूर येथे शेतीची पाहणी केली. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह महसूल, कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी शिवापूर येथील शेतकरी गजानन जळमकार यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केली व गावातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ०००

डॉ. पं. दे. कृ. वि व कृषी विभागाचा उपक्रम; शिवारफेरी-२०२४ व चर्चासत्राचा समारोप शेतकऱ्याला परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील -

इमेज
अकोला ,  दि. २२ : ज्ञान व संशोधन केवळ चार भिंतीत न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी शिवार फेरीसारखा उपक्रम स्तुत्य आहे. अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवावी. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन नवसंशोधनाला चालना द्यावी आणि शेतकऱ्याला परवडेल असे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे ,  असे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आयोजित अकोला येथे शिवार फेरी व चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.  पालकमंत्री श्री  विखे पाटील यांनी प्रारंभी श्रीमती शालिनीताई विखे पाटील यांच्यासह शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. खासदार अनुप धोत्रे ,  आमदार रणधीर सावरकर , आमदार प्रकाश भारसाकळे ,  आमदार हरीश पिंपळे ,  आमदार वसंत खंडेलवाल ,  आमदार अमोल मिटकरी ,  कार्यकारी समितीचे सदस्य विठ्ठल सरप पाटील ,  हेमलता अंधारे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख ,  जिल्हाधिकारी अजित...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

इमेज
  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ अकोला, दि. 20 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातील केंद्रांच्या लोकार्पणाचा मुख्य कार्यक्रम वर्धा येथे झाला. अकोला जिल्ह्यात १४ महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ कार्यक्रम श्रीमती मेहरबानु विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हास्तरीय कार्यक्रमाला आमदार वसंत खंडेलवाल, संस्थेचे अध्यक्ष दीपेन शहा, सचिव नरेंद्र पटेल, कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके,  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता शिंगरूप, उपप्राचार्य डॉ. मयूर मालवीया आदी उपस्थित होते. वर्धा येथील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात करण्यात आले. कौशल्य विकास केंद्रे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक - जिल्हाधिकारी कोणत्याही क्षेत्रात काम करताना प्रगतीसाठी कौशल्य आवश्यक असते. कार्यरत असताना अद्ययावत ज्ञान आत्मसात क...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर स्वागत

इमेज
  अकोला ,  दि.१९  :   राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी ४.३० वाजता शिवनी विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे समवेत खा.अनुप धोत्रे ,  आ. वसंत खंडेलवाल ,  आ.रणधीर सावरकर ,  आ. प्रकाश भारसाकडे आ.हरीश पिंपळे ,  आ.डॉ. संजय कुटे आदी उपस्थित होते. प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अजित कुंभार ,  पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जावळे ,  तसेच अन्य विभागप्रमुख ,  महानुभाव पंथ  प्रतिनिधी  उपस्थित होते. नंतर विमानाने नागपूरला रवाना झाले . ०००००

जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे वाढली

  विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे वाढली अकोला, दि. 18 :  भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्‍या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण  करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे वाढली असून, एकूण केंद्रांची संख्या 1 हजार 741 झाली आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून  सर्व वि धानसभा मतदार संघांच्या सुसुत्रीकरण प्रस्‍तावांबाबत  मान्‍यताप्राप्‍त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत  चर्चा करण्‍यात आली व प्रस्तावित बदलांबाबत त्यांना अवगत करण्‍यात आले. यासंबंधी  आक्षेप व सूचना मागवण्‍यात आल्‍या होत्‍या. त्या   विचारात घेऊन व प्रशासकीय बाबी तपासून मतदान केंद्र सुसुत्रीकरण प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला. त्याला भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 1 हजार 719 मतदान केंद्रे होती. या केंद्रांत नव्याने 22 मतदान केंद्रांची भर पडली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आता 1 हजार 741  मतदान केंद...

वसतिगृहांत प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

  वसतिगृहांत प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ अकोला, दि. १८ : सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहातर्फे करण्यात आले आहे. अकोला येथे शिक्षण घेत असलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना   टक्केवारीनुसार रिक्त जागांवर प्रवेश देणे सुरू आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org   या संकेतस्थळावर भरता येईल. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न, जातीचा दाखला, आधारपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक प्रत, गुणपत्रिका, रहिवासी दाखला आदी कागदपत्रे जोडावीत. ऑनलाईन अर्जाची प्रिंट कार्यालयात आणून द्यावी. मुलांचे शासकीय वसतिगृह हनुमान वस्तीमधील संतोषी माता देवळाजवळ आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ८३०८०५८८३३ वर संपर्क साधावा. ०००