कृषि वसंत अभियानाला जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी मॅडम जिल्हा परिषद अकोला यांची भेट!

   






जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात कृषी वसंत अभियान कृषी विभागग्रामविकास विभाग  व महसूल विभाग यांच्या समन्वयाने राबविले जात आहे सदर कार्यक्रमांमध्ये घरगुती बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम राबवणे,बीबीएफ वर सोयाबीन पिकाची पेरणी याबाबत मार्गदर्शन करणे शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करणे,विविध नाविन्यपूर्ण पिकाचे  प्रात्यक्षिकाबाबत मार्गदर्शन करणे अन्नप्रक्रियाफळ प्रक्रिया बाबत मार्गदर्शन करणे,100% पी एम किसान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणेनाविन्यपूर्ण पिकांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे शेतकरी ते ग्राहक भेट शेतमाल विक्री बाबत मार्गदर्शन करणे मग्रारोहयो अंतर्गत सन 2024 -25 मधील सिंचन विहीरसोबत शेतकऱ्याला विहीर तिथे फळबाग व ठिबक देणे,नाडेप कंपोस्ट चे युनिट तयार करणे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नन्वय योजना (PMFME)अंतर्गत लाभार्थी निवड करणे एकंदरीत येत्या खरिपाचे शिस्तबद्ध नियोजन करून शेतकरी बांधवाच्या उत्पन्नात भर घालणे असा उद्देश घेऊन मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी कृषि वसंत अभियान जिल्हाभर राबवत आहेतया मध्ये आज दि 14 मे रोजी मा. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पातूर तालुक्यातील मौजे देऊळगाव येथे शेतकरी,कृषिमहसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारीकर्मचारी यांच्या

समवेत बियाणे उगवण शक्ती तपासण्याचे प्रात्यक्षिक घेतले,

तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत मौजे तांदळी बु येथे सिंचन विहिरी ची तपासणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी मॅडम यांनी स्वतः केलीसोबत उप मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अकोलातहसीलदार पातूर राहुल वानखडेतालुका कृषि अधिकारी धनंजय शेटेगट विकास अधिकारी अगर्ते तसेंच कृषिमहसूलग्रामविकास विभागाचे अधिकारी कर्मचारीव मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम