मतदार जागृती कार्यासाठी ब्रिजमोहन चितलांगे यांचा गौरव
मतदार जागृती कार्यासाठी
ब्रिजमोहन चितलांगे यांचा गौरव
अकोला, दि. 17 : ‘स्वीप’ मोहिमेत
मतदार जागृतीसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल ‘गुजरात अंबुजा एक्स्पोर्टस्’चे प्रेसिडेंट
(ऑपरेशन्स) ब्रिजमोहन चितलांगे यांचा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांच्या
हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हाधिका-यांच्या दालनात
झालेल्या या कार्यक्रमाला ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, उपजिल्हा निवडणूक
अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे संतोष बन्सोड आदी उपस्थित होते.
शहरात भव्य मानवी साखळीद्वारे
मतदार जागृती करण्यात आली. या उपक्रमासाठी श्री. चितलांगे यांनी दिलेल्या सहकार्य
व योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. ‘स्वीप’
मोहिमेत मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर विविध कार्यक्रम
घेण्यात आले. जिल्हा स्तरावरही विविध संस्थांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम
राबविण्यात आले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा