नियोजनभवनात कार्यक्रम महिलांमध्ये आरोग्याबाबत जाणीवजागृतीसाठी संघटित प्रयत्न करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार





              

अकोलादि. १४ : स्वच्छता आणि आरोग्य यांचा दृढ संबंध आहे. महिलांची सुरक्षितता आणि सन्मानत्यांचे मानवी हक्क जपण्यासाठी त्यांच्यात स्वच्छता व आरोग्याबाबत जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संघटित प्रयत्न करावेतअसे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे सांगितले.    

 जिल्हा प्रशासन व क्षितिज सामाजिक  संस्थेतर्फे मासिक पाळी स्वच्छता दिवसानिमित्त रजोत्सव कार्यक्रम नियोजन भवनात झालात्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवीजुईली अजित कुंभारजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवेमहिला बालविकास उपमुख्य कार्य अधिकारी राजश्री कोलखेडेअनिता तेलंगअमित रायबोलेशिक्षणाधिकारी सुचेता पाटकररतनसिंग पवारपोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णीनितीन खंडेलवालप्रभा खंडेलवाल आदी उपस्थित होते.

महिला संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत  महिलाभगिनींमध्ये अधिकाधिक जनजागृती  करावीअसे जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध जागृतीपत्रकांचे प्रकाशन झाले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम