‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची कठोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 





 

  ‘पीसीपीएनडीटी’  कायद्याची कठोर अंमलबजावणी करा

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 15 : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची (पीसीपीएनडीटी) जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने प्रसूतीपूर्व कालावधीत नोंदणी, एएनसी ट्रॅकिंग, तसेच सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्रांच्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

  ‘पीसीपीएनडीटी’ समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ वंदना पटोकार, डॉ. भावना हाडोळे, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोलखेडे, विधी समुपदेशक ॲड.शुभांगी ठाकरे, डॉ. मंगेश दातीर, डॉ स्वप्निल माहोरे, डॉ.विजय चव्हाण, डॉ. संदीप ताथोड, मोहन खडसे, गोपाळ मुकुंद आदी उपस्थित होते.

श्री. कुंभार म्हणाले की, लिंग निवड रोखणे व गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्राचा गैरवापर होऊ नये यासाठी काटेकोर प्रयत्न आवश्यक आहेत. प्रसूतीपूर्व कालावधी गर्भवती महिलांच्या व अर्भकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे तशी नोंदणी व्हावी. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत भरीव जनजागृती करावी.  बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी 1800 233 4475 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन यावेळी करण्यात आले.  

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम