पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा

 

पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा

अकोला, दि. 9 : जिल्ह्यात दि. 9 ते 12 मे दरम्यान वादळ, अवकाळी पाऊस, गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शेतकरी बांधवांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठवणूक, बाजार समितीत माल आणला असल्यास आवश्यक दक्षता घ्यावी. वीज, गारांपासून बचावासाठी सुरक्षित आश्रय घ्यावा. वीज चमकताना मोबाईल बंद ठेवावा. झाडाखाली थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम