पळसो बढे व गाझीपूर येथील जनावरांत लंपीचा प्रादुर्भाव जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध
पळसो बढे व गाझीपूर येथील
जनावरांत लंपीचा प्रादुर्भाव
जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध
अकोला, दि. २६ : अकोला तालुक्यातील
पळसो बढे व मूर्तिजापूर तालुक्यातील गाझीपूर येथील जनावरांत लंपी त्वचारोगाची लागण
झाल्याचे आढळले. तसा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानुसार संसर्ग केंद्रापासून १०
किमी क्षेत्र बाधित घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी Dpgl कुंभार
यांनी निर्गमित केला.
प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार पळसो
बढे व गाझीपूर येथील संसर्ग केंद्रापासून १० किमी बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले
आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी
व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित
करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करण्यात यावे, असे आदेश जिल्हा पशुसंवर्धन
उपायुक्त, जि. प. जिल्हा पशुसंवर्धन
अधिकारी, तसेच जिल्हा पशूवैद्यकीय
सर्वचिकित्सालयाला देण्यात आले आहेत.
0000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा