अवसायनात संस्थांची नोंदणी रद्द करण्यापूर्वी दि. 31 मे रोजी आमसभा

 

अवसायनात संस्थांची नोंदणी रद्द

करण्यापूर्वी दि. 31 मे रोजी आमसभा

अकोला, दि. 27 : जिल्ह्यातील विविध अवसायनात संस्था अवसायनात काढण्यात आल्या असून, त्यांची नोंदणी रद्द करण्यापूर्वी दि. 31 मे रोजी अंतिम आमसभा होणार आहे.

अकोट तालुक्यातील अकोली जहाँगीर येथील भूमी दुग्धोत्पादक सहकारी संस्था, बाळापूर तालुक्यातील दधम येथील जय भवानी दुग्धोत्पादक सहकारी संस्था, बाळापूर येथील अंबिका दुग्धोत्पादक सहकारी संस्था, तसेच वाडेगाव येथील सबका मालिक एक शेळी मेंढीपालन सहकारी संस्था या संस्थांचा त्यात समावेश आहे.

या संस्थांची बँक खाती अवसायकांनी बंद केली असून, परिसमापनाची कार्यवाही संपविण्यासाठी नोंदणी रद्द करण्यापूर्वीची अंतिम सभा जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (पदुम) या कार्यालयात दि. 31 मे रोजी दु. 12 वा. होणार आहे. या सभेत सभासदांनी आपले काही म्हणणे असल्यास लेखी सादर करावे. सभेची गणपूर्ती झाली नाही तरी नोंदणी रद्द करण्याचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे, असे लेखापरीक्षकांनी नमूद केले आहे.

 

या संस्था दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळापासून अवसायनात काढण्यात आल्या असून, सर्व संस्थांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून संस्थेची मिळकत, दप्तर, देणे-घेणे आदी रेकॉर्डचा पदभार देण्याबाबत कळविण्यात आले आहे. प्रत्यक्ष भेट किंवा भ्रमणध्वनीद्वारेही सूचना देण्यात आल्या. मोजक्या संस्था वगळता इतर संस्थांनी रेकॉर्ड किंवा आपले म्हणणे सादर केले नाही.  अकोला व वाशिम जिल्ह्यातील विविध दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, शेळीमेंढी पालन सहकारी संस्थांसह इतर 70 संस्था आतापर्यंत अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम