ज्वारी, मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
ज्वारी, मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
अकोला, दि. 9 : आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने ज्वारी, बाजरी व मका
खरेदीसाठी शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली असून, ती दि. 31 मेपर्यंत
चालू राहील, असे पणन मंडळाचे जिल्हा विपणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी कळवले
आहे.
जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी व मूर्तिजापूर
येथील केंद्रांवरील खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. खरेदीची मुदत
दि. 8 मेपासून दि. 30 जूनपर्यंत राहील. ऑनलाईन नोंदणी ‘एनईएमएल’ पोर्टलवर
करण्यासाठी ज्वारी, मका, बाजरी आदी पेरा नोंद असलेला सातबारा, आधारलिंक असलेला
बँकेचा खाते क्रमांक, आधारकार्डाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक, तसेच ऑनलाईन नोंदणी
करतेवेळी शेतक-यांचे स्वत:चे छायाचित्र घेणे बंधनकारक आहे. पेमेंट प्रणाली पीएएमएस
असून, संयुक्त बँक खाते स्वीकारले जाणार नाही. शेतकरी बांधवांनी तत्काळ नोंदणी
करून घ्यावी, असे आवाहन श्री. शिंगणे यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा