तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी खुला

 तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा

नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी खुला
अकोला, दि. 27 : शालेय शिक्षणात इयत्ता तिसरी ते बारावीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी परिषदेच्या संकेतस्थळावर (www.maa.ac.in) खुला करण्यात आला आहे.
आराखड्याच्या मसुद्याबाबत सर्व समाजघटक, शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दि. 3 जूनपर्यंत द्यावेत. अभिप्राय नोंदविताना आपले नाव, मोबाईल, पत्ता, अभिप्राय, मूळ मसुद्यातील तपशील, आवश्यक बदल, सुधारित मजकूर कसा असावा, आदी माहिती द्यावी. अभिप्राय पोस्टाने पाठवायचा असल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 708, सदाशिवपेठ, कुमठेकर मार्ग, पुणे 411030 या पत्त्यावर पाठवावेत किंवा ऑनलाईन नोंदवावा.
✍️आपले मत नोंदविण्याची उत्तम संधी
आराखड्यानुसार मसुद्याचे अंतिम पाठ्यक्रमात रूपांतर होण्यापूर्वी शिक्षक, पालक व विविध समाजघटकांना त्यात बदल सुचविण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातून अधिकाधिक नागरिकांनी अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य रत्नमाला खडके यांनी केले आहे.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम