महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रातर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम

 

महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रातर्फे

सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम

अकोला, दि. 6 : महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रातर्फे सशुल्क ब्युटीपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम दि. 20 मेपासून सुरू होणार आहे. त्यासाठी दि. 16 मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वयोगट 18 ते 45 वर्षांदरम्यान व दहावी उत्तीर्ण व्यक्तीला प्रवेश मिळू शकेल. प्रशिक्षणात ब्युटीपार्लर, केशरचना, मेकअप आदी बाबी प्रात्यक्षिकांसह शिकवल्या जातील. त्याशिवाय, व्यक्तिमत्व विकास, उद्योग नोंदणी, बाजारपेठ पाहणी, कर्ज प्रक्रिया व विविध योजनांची माहिती दिली जाईल.

अधिक माहितीसाठी कल्याणी तिजारे यांच्याशी 9822391337 व वृषाली काळणे यांच्याशी 9373996027 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे व प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम