जिल्हाधिकारी निवासस्थानी ध्वजारोहण


 

 जिल्हाधिकारी निवासस्थानी ध्वजारोहण

अकोला, दि. 1 : जिल्हाधिकारी निवासस्थानी महाराष्ट्रदिनानिमित्त ध्वजारोहण जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज झाले.

यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राण त्यागणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रदिनानिमित्त विविध बालगृहांतील बालकांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले.

डॉ. जुईली अजित कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बालसंरक्षण अधिकारी सुनील लाडुलकर, जिल्हाधिका-यांचे स्वीय सहायक गजानन गवई, मोहन साठे, गायत्री बालिकाश्रम, शासकीय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह, सूर्योदय बालगृह येथील बालके, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

०००   


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम