सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वस्तूंचे वाटप परिमाण जाहीर

 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वस्तूंचे वाटप परिमाण जाहीर

अकोला, दि. 27 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्नधान्य , नियंत्रित साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचे अकोला जिल्ह्यासाठी जुलै महिन्याचे वाटप परिमाण जिल्हा पुरवठा अधिका-यांनी जाहीर केले आहे.

त्यानुसार प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू प्रतिव्यक्ती 1 किलो व फोर्टिफाईड तांदूळ प्रतिव्यक्ती 4 किलो विनामूल्य वितरित होईल. अंत्योदय अन्न योजनेत गहू प्रतिकार्ड 10 किलो व फोर्टिफाईड तांदूळ प्रतिकार्ड 25 किलो विनामूल्य वितरित होईल. अंत्योदय लाभार्थ्यांसाठी 20 रू. प्रतिकिलो दराने नियंत्रित साखर प्रतिकार्ड 1 किलो वितरित होईल. गोदामातील साठा उपलब्धता व लाभार्थी संख्येनुसार वाटपाचे परिमाण राहील.

 

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम